कोण ठरणार आयपीएलचा बादशाह ? आज फायनल

srh-vs-csk-

मुंबई: दोन दिग्गज टीममध्ये आज आयपीएलची फायनल रंगणार आहे. मिअदानात अक्षरशा धावांचा पाऊस पडणारे दोन्ही संघ आज आमनेसाने भिडणार आहेत. आज आयपीएलचा बादशाह कोण ? हे ठरणार आहे.

अफगाणिस्तानच्या रशिद खानने अष्टपैलू कामगिरी बजावून सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या फायनलचं दुसरं तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे आयपीएलच्या विजेतेपदासाठी रविवारी आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल पाहायला मिळेल.

Loading...

सनरायझर्स हैदराबादच्या विजयाचा नायक ठरला तो रशिद खान. संघाला गरज असताना त्याने 10 चेंडूंत चार षटकारांसह नाबाद 34 धावांची तुफानी खेळी साकारली. त्यानंतर कोलकात्याच्या तीन फलंदाजांना आपल्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर तंबूत धाडत रशिदने हैदराबादच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

हैदराबादकडून राशिद खानने ४ षटकात १९ धावा देत ३ गडी घेतले. त्याला कार्लोस ब्रेथवेट आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी २-२ तर शाकिब अल हसनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नईची फलंदाजी व सनरायझर्सची गोलंदाजी यांच्यादरम्यान ही लढत होईल. चेन्नईला सनरायझर्सचा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेटवर अंकुश ठेवावा लागेल. त्याने डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली आणि चेन्नईविरुद्ध नाबाद ४३ धावा फटकावल्या होत्या. दुसऱ्या बाजूचा विचार करता सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमन्सला कामगिरीत सातत्य राखण्याची आशा असेल. शिखर धवनवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहील. चेन्नई संघात शेन वॉटसन, सुरेश रैना व अंबाती रायुडू यांच्यासारखे फॉर्मात असलेले फलंदाज आहेत, तर कर्णधार धोनीने फिनिशरची भूमिका बजावली आहे. डू प्लेसिसचे खेळणे निश्चित आहे, तर रवींद्र जडेजा तळाच्या स्थानी उपयुक्त फलंदाज आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का