औरंगाबाद महापालिकाचा कोण होणार उपमहापौर?

aurangabad mahanagarpalika

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार आहे. त्यापूर्वी रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तीन महिन्यांच्या या पदासाठी महापालिकेत सर्वच पक्षांत चुरस निर्माण झाली असून, काल  29 नामनिर्देशन पत्र घेण्यात आले. 31 डिसेंबरला निवडणूक होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचा निषेध करत भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार गुरुवारी नगरसचिव कार्यालयामार्फत नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. दिवसभरात नगरसेवक गजानन बारवाल, जोहराबी नासेर खान, अफसर खान यासीन खॉ, गंगाधर ढगे, अंकिता विधाते, बन्सी जाधव, परवीन खैसर खान, रेशमा अशफाक कुरेशी, भाऊसाहेब जगताप, खान अय्युब म. हुसेन खान, शबनम बेगम कलीम कुरेशी, रमेश जायभाय, मुल्ला सलीमा बेगम खाजोद्दीन, अब्दुल रहिम शेख नाईकवाडी यांनी 29 नामनिर्देशनपत्र घेतले. तर आज नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत, तर 31 डिसेंबरला निवडणूक होणार आहे.

Loading...

राज्यातील नव्या समीकरणानुसार उपमहापौरपद आपल्याला मिळावे, अशी मागणी कॉंग्रेसने शिवसेनेकडे केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात शुक्रवारी निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. भाजपने उपमहापौरपदासाठी अर्ज घेतलेला नाही; मात्र भाजपसोबत असलेल्या अपक्षांच्या आघाडीचे गटनेते गजानन बारवाल यांनी मात्र अर्ज घेतला आहे. शुक्रवारी किती अर्ज दाखल होतात, हे स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र कळेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी