बारामतीमध्ये कोण जिंकणार ? प्रकाश आंबेडकर म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा- बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव झाल्यास ईव्हीएममधील फेरफारामुळंच होऊ शकतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावरून बारामतीच्या निकालाबद्दल त्यांच्या मनात धाकधूक असल्याची चर्चा होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र पवारांची ही भीती अनाठायी असल्याचं सांगितलं.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘शरद पवारांनी बारामतीत बऱ्यापैकी काम केलं आहे. बारामतीत पराभवाची त्यांची भीती मला खरी वाटत नाही. तिथं सुप्रिया सुळे पराभूत होणार नाहीत,’ असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केला.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार ?

ज्यांनी कधी जनतेतून निवडणूक लढवली नाही, ते नेते बारामती लोकसभा जिंकण्याची भाषा करत आहेत, त्यामुळे अशा लोकांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने काही गडबड केली आहे का, हि शंका अनेकांना वाटत आहे. बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणुकांवरून विश्वास उडेल.