खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूने खळबळ ; कोण होते खासदार मोहन डेलकर ?

mohan delkar

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. मरिन ड्राईव्ह परिसरातल्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये आत्महत्या केली. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत मृतावस्थेत आढळले. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला.

मोहन डेलकर हे तब्बल सात वेळा दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र २०१९ मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे विद्यमान खासदार होते. डेलकर यांची कारकीर्द कामगार संघटनेचा नेता म्हणून सुरु झाली.आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला.१९८५ मध्ये त्यांनी आदिवासी विकास संघटना सुरु केली. १९८९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, अपक्ष म्हणून त्यांनी दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात विजय मिळवला होता.

मग ते १९९१ ते १९९६ दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं. मग १९९८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, त्यांच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. मग २००४ मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाकडून ते पुन्हा लोकसभेवर गेले.

४ फेब्रुवारी २००९ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला मग २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन, अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. २०२० मध्ये मोहन डेलकर यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या