गिरीश महाजनांना फोन करून धमकावणारा अखेर गजाआड

जळगाव: भाजप नेते आणि माजी सिंचन मंत्री व जामनेरचे विध्यमान आमदार गिरीश महाजन यांना ‘एक कोटी रुपये द्या,अन्यथा बॉम्बने उडवून देऊ’ अशी धमकी देणाऱ्या आरोपीला जामनेर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. ‘एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ,’ अशी धमकी गिरीश महाजन यांना देण्यात आली होती.

याप्रकरणी नुकतेच जामनेर पोलिसांनी तपास करत.अवघ्या दोन दिवसात धमकी देणाऱ्याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत महाजनांना धमकी देणारी व्यक्ती पाचोरा एसटी डेपो येथे वाहक म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळते आहे.

१४ ऑक्टोंबर रोजी जामनेरमध्ये जी. एम. फाऊंडेशच्या ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांना आलेल्या निनावी फोनवरुन ही धमकी देण्यात आली.

खंडणीसाठी धमकावणाऱ्याने केवळ फोनच केला नाही, तर त्याच फोनवर धमकावणारा मेसेज देखील पाठवला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक कोटी रुपये द्या, नाही तर बॉम्ब ब्लास्ट करु”, अशी धमकी यावेळी देण्यात आली होती अशी माहिती तायडे यांनी दिली होती.त्याचबरोबर धमकी देणारा हा हिंदीत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-