आयएनएस विक्रांत घोटाळ्यासंबंधी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलीस विभागाकडून कसून चौकशी सुरु आहे. तसेच उच्च न्यायालयाने घोटाळ्यातील आरोपींनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आर्थिक गुन्हे विभाग आणि पोलीस हा तपास करण्यासाठी सक्षम आहेत, असे म्हणाले.