जे विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देतात त्यांना राजीव गांधींवर बोलल्यामुळे राग का ?

Rahul-Gandhi-Narendra-Modi-

टीम महाराष्ट्र देशा : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी बोलताना मोदींनी ‘मी केवळ माहिती दिली. मात्र त्यावरुन संपूर्ण काँग्रेस पक्षाला इतका राग का आला, ते मला समजत नाही. जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष एका विद्यमान पंतप्रधानाला शिव्या देतात, त्याच्या कुटुंबाची, गरिबीची टिंगल करतात, तेव्हा हाच काँग्रेस पक्ष टाळ्या वाजवत असतो’ असं म्हणत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्याकडून नरेंद्र मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. तर मोदी यांनी पलटवार करत राजीव गांधी यांचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपल्याची टीका केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे.