कोणीही तीन मुलांच्या आईवर कशाला बलात्कार करेल ; भाजप आमदाराने खाल्ली माती

टीम महाराष्ट्र देशा : उत्तरप्रदेश मधील उन्नाव येथील सामुहिक बलात्कार प्रकरणावरून सध्या भाजप आणि योगी सरकारला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत असतानाच भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी माती खाल्ली आहे. सुरेंद्र सिंह यांनी आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचे समर्थन करताना ‘कोणीही तीन मुलांच्या आईवर कशाला बलात्कार करेल’ असे संतापजनक वक्तव्य केलं आहे.

हे महाशय एवढ्यावरच थांबले नाही तर मी मानशास्त्रीयदृष्ट्या बोलत आहे. कोणीही तीन मुलांच्या आईवर बलात्कार करणार नाही. हे शक्यच नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार सेनगर यांच्याविरुद्ध रचलेले षडयंत्र आहे. पीडितेच्या वडिलांना कोणीतरी मारहाण केली असेल, पण मी बलात्काराचा आरोप निराधार मानतो, असे मुक्ताफळे सुद्धा यांनी उधळली आहेत.

bagdure

काय आहे प्रकरण ?

उन्नाव येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्याविरोधात भादंवि कलम 363, 366, 376 आणि 506 तसेच पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेनगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...