‘कलम ३७० ला विरोध करणारे स्वार्थी राजकारणी’

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु कॉंग्रेस आणि इतर काही राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ विधान केले आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना मोदी यांनी ‘तुम्ही अशा लोकांची यादी बनवा ज्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याला विरोध केला. या यादीत तुम्हाला स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांप्रती सहानभुती दाखविणारी लोकं आणि विरोधी पक्षातील काही नेते दिसतील. म्हणे जे नेते स्वार्थी नेते आहेत अशाच नेत्यांनी कलम ३७० च्या निर्णयाला विरोध केला आहे असं मोदी म्हणाले आहेत.

Loading...

पुढे बोलताना मोदी यांनी प्रत्येक जण केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करतोय. हा विषय राष्ट्राचा आहे यात राजकारणाचा भाग नाही. देशातील लोकांना हा धाडसी निर्णय वाटतो कारण आजतागायत जे अशक्य वाटत होतं ते शक्य होताना दिसत आहे असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी १५ ऑगस्टनंतर राज्यातील वाहतुकीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येतील तसेच फोन, इंटरनेट ही माध्यमे युवकांना भडकवण्याची तसेच त्यांची दिशाभूल करण्याची कामे करतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोवर यावरील निर्बंध कायम राहतील अशी माहिती दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'