डावखरेंचे ‘डाव’ खरे होणार की पुन्हा ‘संजयच’ येणार..?

niranjan davkhare

मुंबई / प्राजक्त झावरे-पाटील : येत्या २५ जून रोजी होत असलेली कोकण पदवीधर निवडणूक रंगतदार होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. शिवसेनेचे संजय मोरे, भाजपचे निरंजन डावखरे व राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांच्यात खरी रंगतदार लढत होणार असून कोकण शिक्षक निवडणुकीसारखा धक्कादायक निकाल लाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सेनेकडून आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे तर भाजपसाठी स्वतः मुख्यमंत्री, खासदार कपिल पाटील व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीसाठी गणेश नाईक व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे प्रचाराची सूत्रे आहेत.

एकंदरीत सगळेच पक्ष जोरदारपणे या मतदारसंघात प्रचार करत आहेत. प्रचाराच्या सुरवातीच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात पदाधिकारी मेळावा घेतला होता आणि आज ठाण्यातच उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. निरंजन डावखरे यांना या निवडणुकीचे तंत्र अवगत असल्याने त्यांनी सुरवातीला आघाडी घेतल्याचं दिसुन येत होते, परंतु सेनेकडून संजय मोरें सारखे प्रबळ उमेदवार दिल्याने व दुखावलेल्या आव्हाडांनी डावखरेंना पाडण्याचा विडाच उचलल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कदाचित आयत्या वेळी राष्ट्रवादीची ताकद देखील सेनेकडे वळवली जाऊ शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. सेना पहिल्यांदाच निवडणूक लढत असली तरी ठाण्यासह सिंधुदुर्ग पर्यंत भाजपा पेक्षा सेनेची ताकद मजबूत आहे. त्याचा फायदा देखील सेनेला होऊ शकतो.

Loading...

थोडक्यात , राष्ट्रवादीतून भाजपा डेरेदाखल होऊन निरंजन यांनी खेळलेला ‘डाव खरा’ होतो की पुन्हा संजय केळकरांनंतर दुसऱ्या ‘संजय’ च्या गळ्यात माळ पडते की आव्हाडांची ‘ नजीब ‘ खेळी मॅन ऑफ द मॅच ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले