मुख्य न्यायाधीशांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ते चार न्यायाधीश कोण ?

suprim court judge

देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर बोट ठेवत खुद्द सर्वोच्च न्यायालयातीलच चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषेद घेत तोफ डागली आहे.

न्यायमूर्तींनी केलेल्या भूकंपाची केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दाखल घेतली असून यावर चर्चा करण्यासाठी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांना तत्काळ बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हे चार न्यायाधीश कोण आहेत हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

न्यायमूर्ती रंजन गोगोई
न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचे वडील केशव चंद्र गोगोई आसामचे मुख्यमंत्री होते. ते फेब्रुवारी 2011 मध्ये पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. एप्रिल, 2012 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार जस्टिस रंजन गोगोई यांचा क्रमांक लागतो. ईशान्य भारताच्या राज्यातून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे ते पहिले आहेत.

न्यायमूर्ती जस्टिस कुरियन जोसेफ
१९७९ मध्ये आपल्या वकिलीला सुरुवात करणारे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांची सन 2000 मध्ये केरळ हायकोर्टाचे मुख्य न्यायामूर्ती म्हणून निवड करण्यात आली. पुढे 2010 मध्ये जोसेफ यांनी मुख्य न्यायामूर्ती हिमाचल प्रदेश हायकोर्ट म्हणून शपथ घेतली. मार्च 2013 पासून ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून काम पाहत आहेत.

जस्टिस मदन भीमराव लोकूर
न्यायमूर्ती मदन भीमराव लोकूर यांनी 1977 मध्ये आपल्या वकिली कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली हायकोर्टात वकिली केली. २०१० मध्ये फेब्रुवारी ते मार्च दरम्यान त्यांनी दिल्ली हायकोर्टात प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे. तसेच गुवाहटी आणि आंध्रप्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून देखील काम पाहिलं आहे

जस्टिस जस्ती चेलमेश्वर
आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात जन्मलेले न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर यांनी केरळ आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाच मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे. फिजिक्समध्ये पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1976 मध्ये आंध्र विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. ऑक्टोबर 2011 मध्ये ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बनले होते.