‘जिनिलिया सोबत हा काका कोण?’, रितेशने पत्नीला वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा

ritesh deshmukh

मुंबई : बॉलीवूडसह मराठी सिनेसृष्टी मध्ये काम  करणार अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. रितेश देशमुख नेहमी सोशल मीडियावर कमालीचे पोस्ट शेअर करत असतो. रितेशची पत्नी जिनिलिया सुद्धा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय दिसते. आज जिनिलियाचा वाढदिवसानिमित्त त्याने एक खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

इनस्टाग्राम अकाऊंटवर रितेशने एक पोस्ट शेयर करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!’, असे लिहिले आहे. तर पुढे एक व्हीडीओ शेयर करत लिहितो,  तू दिवसेंदिवस आणखीनच तरुण दिसत आहे. लवकरच लोक म्हणतील, जिनिलिया सोबत हा काका कोण आहे?’. यावर अनेक लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत असून चाहत्यांनी जेनेलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या रितेशची ही पोस्ट बरीच व्हायरल होत आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा इंडस्ट्रीमधील सर्वात ‘क्यूट कपल’ आहे यात शंका नाही. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले. त्यावेळी जेनेलिया सुरुवातीला रितेशसोबत बोलतही नव्हती. मात्र नंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि हे दोघे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यांना आता दोन छान मुले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या