कोण आहे ती ? ट्विटरवर चर्चा

natalia ramos

वेब टीम :सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी सध्या थोड्याश्या वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहेत . एका सुंदर तरुणीने राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर त्याच तरुणीने शेअर केला आहे. तिचं हे ट्विट चांगलच ट्रोल होऊ लागलं आहे . ट्विटर वर काहींनी राहुल गांधी यांना तिरकस टोमणे मारायला सुरुवात केली असून ही सुंदर तरुणी कोण ?याचा शोध नेटीझन्स घेवू लागले आहेत .

नतालिया रामोस ही अमेरिकेत राहणारी स्पॅनिश-ऑस्ट्रेलियन वंशाची अभिनेत्री आहे. तिने हा फोटो शेअर केल्यानंतर ही आहे तरी कोण असा लोकांना प्रश्न पडायला लागला होता.राहुल गांधी यांनी विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांचे विचार या लोकांसमोर मांडले होते. यामध्ये या अभिनेत्रीचाही समावेश होता. तिने लगेच राहुल गांधींच्या उत्तम वाक्पटू आणि ज्ञान असलेल्या राहुल गांधी यांच्यासोबत अनेक देशातील विविध आणि उत्कृष्ट विचार असलेल्या मंडळींची भेट झाली. अशी उदारमतवादी माणसं एकत्र आली तरच आपण या विश्वाला सुंदर बनवू शकतो असं ट्विटवर लिहलं होतं.काहींनी तर या फोटोचा संबंध राहुल गांधी यांच्या लग्नाशी देखील जोडला आहे.