हि सुंदर मुलगी आहे तरी कोण?

टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपासून एक मुलगी आणि मुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच तरुण-तरुणींनी हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात  शेअर केला. या व्हिडिओमध्ये  डोळ्यांच्या जादूने प्रेम व्यक्त केल आहे. त्यामुळे या व्हिडिओनं सोशल मीडियावर सगळ्यांनाच वेड लावलं आहे. हि सुंदर मुलगी कोण बर असावी हा प्रश्न सर्वांचा पडला असेल. आणि हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. कारण तीच सौंदर्य मोहात पडणार आहे.

Priya-Varrier-Biography

तर हि सुंदर मुलगी आहे प्रिया प्रकाश वारियर. ही दक्षिण भारतातली अभिनेत्री आहे. प्रिया अवघी १८ वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार हे गाणं आहे मल्ल्याळम सिनेमा ‘ओरु अदार लव्ह’ मधलं. या गाण्याचे बोल आहेत ‘मनिक्या मलराया पूवी’. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. शिवाय प्रियाच्या काही क्यूट एक्सप्रेशन्सची चर्चा थांबता थांबत नाही आहे. तिच्या डोळ्यांच्या खूणा आणि त्यावर घायाळ होणारे अनेक जण सोशल मीडियावर गाण्याचं फारच कौतुक करतायेत. या गाण्याने बघता बघता ४५ लाखांच्यावर व्ह्युज मिळवले आहेत. योगायोग व्हॅलेंटाईन्स डे सुरु असल्यामुळे या व्हिडिओ तरुणांनी डोक्यावर घेतले आहे.

priya v

priya

priya variar

priya v

You might also like
Comments
Loading...