कोण आहे तो युवक ज्याने राजकीय धुरुंदर योगी आदित्यनाथांचा गड उध्वस्त केला

भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाने मारली मुसंडी

लखनऊ: उत्तर प्रदेश मध्ये पोटनिवडणुकीत चक्क २९ वर्षीय राजकारणात नवीन असलेल्या अभियंत्याने योगी आदित्यनाथ यांचा गड उध्वस्त केला. उत्तर प्रदेश मधील निकालामुळे देशातील राजकारणाला नवीन दिशा मिळाल्याची चर्चा आहे. मात्र युपीत हे कसं शक्य झाल म्हणून भाजप नेते अजूनही चिंतेत आहेत. भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाने जबरदस्त मुसंडी मारली.

गोरखपूर लोकसभा मतदारसंघात २९ वर्षांनंतर पहिल्यांदाच गोरक्षधाम मठाबाहेरील एखादी व्यक्ती निवडून आली आहे. यापूर्वी महंत अवैद्यनाथ आणि नंतर योगी आदित्यनाथ १९८९ ते २०१७ पर्यंत गोरखपूरचे खासदार राहिले आहेत. पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाकडून प्रवीणकुमार निषाद गोरखपूरचे खासदार झाले आहेत.

कोण आहेत प्रवीणकुमार निषाद ?

प्रवीणकुमार निषाद हे अवघे २९ वर्षांचे असून ते लखनऊ येथील गौतम बुद्ध विद्यापीठातून २०११ साली अभियंत्याची पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी एमबीए पदवीही मिळवली. त्यांच्याविरोधात एकही गुन्हेगारीविषयक गुन्ह्याची नोंद नाही. प्रवीण यांची पत्नी रितिका या सरकारी नोकरी करतात. प्रवीण यांच्याकडे सुमारे ११ लाख रूपयांची संपत्ती आहे. यात ९९ हजारांचे कर्ज देखील आहे. प्रवीण आणि रितिका यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

प्रवीण यांना या निवडणुकीत ४,५६,५१३ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरील भाजपाचे उमेदवार उपेंद्र शुक्ल या ४,३४,५१३ मते मिळाली. २०१४च्या लोकसभा निवडणकीवेळी योगी आदित्यनाथ हे सुमारे ३ लाख मतांनी निवडून आले होते

You might also like
Comments
Loading...