fbpx

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत वाघा बॉर्डरपर्यंत असणारी ती महिला कोण ?

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी मायदेशी परतले आहेत. पाकिस्तानी वायुदलाच्या विमानांना हुसकावून लावणारे अभिनंदन यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले होते. दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांना सुरक्षितपणे वाघा बॉर्डरपर्यंत आणण्यासाठी एका महिलेने मोलाची कामगिरी बजावली आहे. आता हि महिला नेमकी कोण हा प्रश्न सर्वाना पडला आहे.

शुक्रवारी रात्री ९ च्या आसपास अभिनंदन यांनी भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले. यावेळी भारतीय वायुदलाने त्यांना ताब्यात घेतले. अभिनंदन यांना लगेचं आणि पुढे हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीला रवाना करण्यात आले. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असणाऱ्या पालम विमानतळावर ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.

दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये एका महिलेने मोलाची कामगिरी बजावली. ती महिला म्हणजे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात भारताच्या संचालक असणाऱ्या डॉ. फरिहा बुगती. डॉ. फरिहा यांनी अभिनंदन यांच्या अटकेपासून सुटकेपर्यंत भारत आणि पाकिस्तानमधला संवाद साधला. एवढचं नाही तर फरिहा बुगती या कुलभूषण जाधव यांचं प्रकरणही पाहत आहेत.