विजय रुपानीनंतर गुजरातचे नवीन मुख्यमंत्री कोण? भाजपा विधिमंडळ पक्षाची आज बैठक

विजय रुपानीनंतर गुजरातचे नवीन मुख्यमंत्री कोण? भाजपा विधिमंडळ पक्षाची आज बैठक

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना रूपानी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून हा भाजपच्या परंपरेचा भाग असल्याचे रुपानी यांनी स्पष्ट केले.

विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरात कोणाच्या हातात असेल याबाबत निर्णय आज घेण्यात येणार आहे. विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजपा विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. अशा वेळी सत्ताबदलाबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विजय रुपानी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच, त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपानी यांना हटविण्यात आले, अशी चर्चा होत आहे.

रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर कोणाकडे नेतृत्व येणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. यात आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, केंद्रीय मंत्री पुरुषत्तोम रूपाला, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर.पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. यापैकी एका नावावर आज रविवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या