कोण आहेत मुंबई विद्यापीठाचे नवीन प्रभारी कुलसचिव

पुन्हा प्रभारी कुलसचिव पदी नव्या अधिका-याची बदली

 

 

मुंबईः विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ दिनेश कांबळे यांना प्रभारी कुलसचिव पदावर आज (गुरुवार) नियुक्त करण्यात आले. विद्यापीठ गेल्या काही दिवसात विद्यार्थांचा निकाल लावण्यात उशीर झाल्यामुळे विद्यापीठ चर्चेत आहेत. हे प्रकरण उच्चन्यायालयात सुद्धा गेले आहे. बुधवारी निकाल लवकर लावावा म्हणून न्यायालयाने विद्यापीठाला ठणकावले. तसेच आज पुन्हा प्रभारी कुलसचिव पदी नव्या अधिका-याची बदली करण्यात आली आहे.

विद्यापीठातील कुलसचिव पद रिक्त असल्याने गेले काही दिवसांपूर्वीच किर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू मगरे यांच्याकडे कुलसचिव पद सोपवले होते. मात्र प्राचार्य महोदय पदावर हजरच नसल्याने या पदावर नवीन अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांची हज समितीवर नियुक्ती झाल्यानंतर या पदावर कोण येणार याबाबत विद्यार्थी संघटनांनी वाद निर्माण केला होता.

विद्यापीठाच्या विशेष कक्षाचे उपकुलसचिव यांची नियुक्ती अखेर या पदावर प्रभारी कार्यकाळासाठी करण्याचा निर्णय झाला. त्याबाबतचे परिपत्रक गुरुवारी मुंबई विद्यापीठाने काढले. प्रभारी कुलसचिव हा अतिरिक्त भार म्हणून डॉ. दिनेश कांबळे सहा महिने कार्यभार सांभाळतील. या दरम्यान कुलसचिव पदाच्या जाहिरातीतून आलेल्या अर्जांपैकी अंतिम प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माजी कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांची नियुक्ती हज समितीवर झाल्यानंतर या पदावर उपकुलसचिव डॉ दिनेश कांबळे किंवा गरवारे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ अर्निक कर्णिक यांच्या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती.

You might also like
Comments
Loading...