मुंबई- बार्शी येथील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून ‘फेसबूक’च्या माध्यमातून ‘लाईव्ह’ करून पनवेल (मुंबई) येथील नंदू तथा बाबा पाटील या व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे नंदू पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत आ. राऊत यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांनी पोलिसांत आज तक्रार देताच पोलिसानी नंदू ऊर्फ बाबा पाटील (रा. पनवेल, नवी मुंबई) यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने पोलिसांनी भादंवि ५०७ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदला आहे. ही घटना 3 मार्च रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुकवरुन धमकी देण्यात आलेल्या प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन सुरु असताना गावगुंडांमध्ये फेसबुक लाइव्ह करुन धमकी देण्याची हिंमत असेल तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,नंदू ऊर्फ बाबा चव्हाण नावाचा गुंड आहे. तो स्वतःला ‘मुंबईबाबा’ समजतो. त्याने आमदार राजेंद्र राऊत यांना धमकी दिली आहे. त्याने एका सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षाचा नावाचा उल्लेख करून त्यांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही राजेंद्र राऊत यांचे दोन्ही हात तोडून टाकू, अशी धमकी दिली आहे.गृहमंत्र्यांनी या गावगुंडाला आजच्या आज अटक केली पाहिजे. राऊत यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचे हातपाय तोडण्याची धमकी देणारा ‘मुंबईबाबा’ कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या :
- बिदाईला नवरी रडता रडता बेशुद्ध, ऱ्हदयविकाराने जागीच मृत्यू
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- घायवळ,आंदेकर,मारणे पाठोपाठ आणखी एका कुख्यात गुंडाच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’