fbpx

विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदी दलित चेहऱ्याला संधी ?

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंड केल्यानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा नवा नेता कोण याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचे नवे चर्चेत असताना नवा नेता निवडण्याचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय आज एकमताने काँग्रेस आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र

मात्र आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने कॉंग्रेसकडून विरोधीपक्षनेतेपदी दलित चेहरा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची कन्या व धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव आघाडीवर आहे. विजय वडेट्टीवार यांच्या नावाचीही एका गटाकडून चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक झाली असता नेते निवडीचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आला.

दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले असून या पदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने या पदावर दलित चेहरा आणावा, अशा हालचाली सुरू आहेत.