तुम्हाला माहिती आहे का ? निरमाच्या पॅकेटवर असलेली मुलगी कोण

टीम महाराष्ट्र देशा : निरमा वॉशिंग पावडरची सुरुवात १९६९ मध्ये गुजरातच्या कर्सन भाई यांनी केली होती. या निरमाच्या पॅकेटवर असेलेली मुलगी कर्सन भाई यांची आहे. या मुलीचे नाव निरुपमा असे आहे.

कर्सन भाई प्रेमाने आपल्या मुलीला निरमा बोलायचे. परंतु दुर्दैवी घटनेत निरुपमाचे निधन झाले. कर्सन भाई यांनी निरमा वॉशिंग पावडरची निर्मिती केली आणि पॅकेटवर निरमाचा फोटो लावायला सुरुवात केली.

त्यांनी तीन वर्षापर्यंत एका अनोख्या वॉशिंग पावडरचा फॉर्मुला बनवला आणि वॉशिंग पावडरची विक्री सुरु केली. त्याकाळी बाजारात सर्फ सारखे वॉशिंग पावडर होते. त्यांची किंमत १५ रुपये प्रति किलो असायची.

परंतु कर्सन भाई निरमा वॉशिंग पावडर फक्त साडेतीन रुपये किलोने विकायचे. हळूहळू कर्सन भाईंच्या अहमदाबाद शहरात निरमा लोकप्रिय होऊ लागला. निरमा बनवण्यापासून ते विकण्यापर्यंत सर्व कामे कर्सन भाईच करत होते. टीव्हीवरच्या जाहिरातीत पहिल्यांदा जेव्हा ‘वॉशिंग पावडर निरमा’चे गाणे आले तेव्हा त्या झिंगलने सर्वांनाच आकर्षित केले.

महत्वाच्या बातम्या