‘मुख्यमंत्री कोण ? हे बसून ठरवूया! अन्यथा युतीतील भांडणात राष्ट्रवादीचा फायदा’

Uddhav-Thackeray-Devendra

कोल्हापूर : शिवसेना स्थापना दिवस मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे जाहीर केले होते. त्यावर मुख्यमंत्री कोण असेल ते भाजप व शिवसेना असे दोघे मिळून एकत्र बसून ठरवूया अशी ऑफर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
“भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना त्याच्या आड यायचं आहे त्यांना सांगतो मी त्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन”. असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री आपलाच असेल असे प्रत्येक पक्षच म्हणत असतो. परंतू गेल्या निवडणूकीत तो भाजपचा झाला. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री कोण असेल ते भाजप व शिवसेना अशा दोघांनी एकत्रित मिळून ठरवूया,अन्यथा युतीतील भांडणात काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होईल.”

शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपकडून वारंवार शिवसेनेला युती करण्यासाठी बोलल्या जाते.