महाराष्ट्राचे नेमके मुख्यमंत्री कोण ? बाळासाहेब थोरातांना पडलाय प्रश्न

मुंबई : पूरग्रस्त महाराष्ट्राला साहाय्य करण्याबाबत केंद्र सरकारची अनास्था उघड झाली आहे. विरोधकांच्या टीकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकसह राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूरचीही हवाई पाहणी केली. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, महाराष्ट्रातील पाहणीवेळी शाह यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावेळी नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा आहेत की, देवेंद्र फडणवीस याचा खुलासा व्हायला हवा, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

केंद्र सरकारनं पूरग्रस्त महाराष्ट्राला अद्याप कोणतीही मदत दिली नाही, यावरुन महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकारची अनास्था दिसते अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यातल्या पूरस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काल मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

Loading...

विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकची हवाई पाहणी केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यासमवेत सांगली आणि कोल्हापूरचीही हवाई पाहणी केली, असा आरोप त्यांनी केला. शहा यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री का नव्हते, असा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, राज्यातल्या पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रूपयांची मागणी करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निधीपैकी, पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी चार हजार सातशे आठ कोटी रूपये तर कोकण, नाशिक आणि इतर आपत्तीग्रस्त जिल्ह्यांसाठी दोन हजार एकशे पाच कोटीं रूपये मदतीची मागणी करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी
शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक