दोन महिने काळजीवाहू मुख्यमंत्री कोण; अजितदादा की एकनाथ शिंदे?

दोन महिने काळजीवाहू मुख्यमंत्री कोण; अजितदादा की एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या आठ दिवसांपासून मनक्याच्या शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरेपीचे उपचार मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये घेत आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर किमान दोन महिने आराम करावा लागणार असे सांगितले जात आहे. यावर तर्कवितर्क लढवले जात असून या काळात राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री कोण असेल? अशी चर्चा सुरु आहे.

त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला जाणार? याबाबतची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच दवाखान्यातून डिस्टचार्ज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मात्र कधी डिस्टचार्ज मिळेल याबाबत नेमकी माहिती मिळाली नाही.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता प्रभार दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. सोशल मीडियावरही तसे मेसेज व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्यात आल्याचे मेसेज व्हायरल झाले होते. त्यावेळी ‘आपल्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्यात आलेली नाहीत’, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

महत्वाच्या बातम्या