मुंबई : “जर मला भाजपने सर्व कार्यालयांचा सिक्युरिटी इंचार्ज केला. तर चार वर्षांनंतर जे अग्नीवीर बाहेर पडतील. त्यांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देऊ शकेन. “असं वक्तव्यं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केलं होत.
याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. नोकऱ्या देऊ शकत नसाल तर देऊ नका, पण, सैन्यदलाची आणि तरूणांची चेष्टा करू नका, असेही डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले. सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण काॅन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल? असा सवाल गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारला विचारला.
महत्वाच्या बातम्या