शीख दंगल प्रकरणी जन्मठेप झालेले सज्जनकुमार नक्की कोण ?

टीम महाराष्ट्र देशा – १९८४ च्या शीख दंगल प्रकरणात ३४ वर्षांनी निकाल देण्यात आला असून. न्यायालयाने काँग्रेस नेता सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सज्जन कुमार नक्की कोण ?
१९७० च्या दशकात सज्जन कुमार हे काँग्रेस नेते संजय गांधी यांच्या संपर्कात आले. १९७७ मध्ये दिल्लीतील मादीपूर भागात त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली नगरसेवक झाले. इथूनच त्याची सक्रिय राजकारणाची सुरुवात झाली. १९७७ ते १९८० या काळात त्याच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख उंचावतच गेला. १९८० मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून अवघ्या ३५ व्या वर्षी सज्जन कुमारला खासदार झाले होते.

१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर ज्या दंगली उसळल्या त्याचा फटका सज्जन कुमारलाही बसला. शीख मतं मिळावीत म्हणून कॉंग्रेस कडून सज्जन कुमारला १९८९ मध्ये त्याला तिकिटही दिलं गेलं नाही. १९९३मध्ये सज्जन कुमारला दिल्ली विधानसभेचे तिकिट देण्यात आले. त्यात निवडूनही आला. मात्र १९९६ मध्ये मात्र त्याचा पराभव झाला. शीख दंगली मध्ये सीबीआयनेही सज्जन कुमार विरोधात आरोप पत्र दाखल केले आहे. १९९८ आणि १९९९ या दोन्ही वर्षात त्याला खासदारकीचे तिकिट दिले गेले नाही. आता शीख दंगली प्रकरणी कोर्टाने सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

You might also like
Comments
Loading...