fbpx

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे कोण आहेत सदावर्ते?

टीम महाराष्ट्र देशा- 29 नोव्हेंबरला विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ते तातडीने राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं. राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केल्याने 1 डिसेंबरपासून राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू झाला आहे. यानुसार मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र अशाप्रकारे दिलेले आरक्षण असंविधानिक आहे, त्यामुळे ते मंजूर करु नये, यासाठी अॅड. सदावर्ते यांनी राज्यपालांकडे विनंती पत्र पाठवलं होतं. मात्र राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे.

अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे असून सध्या मुंबईतच राहतात. त्यांनी यापूर्वी मराठा आरक्षण, 154 पीएसआय नियुक्ती प्रकरण, अंगणवाडी सेविका अशा अनेक याचिकांमध्ये काम पाहिलं आहे. मराठा आरक्षण प्रकरणात अॅड. सदावर्ते यांना 18 धमक्या मिळाल्या असून 1 डिसेंबर रोजी त्यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिकाही अॅड. सदावर्ते यांनी हैदराबाद हायकोर्टात केली होती. आणखी एक बाब म्हणजे मुंबईतील परळमधल्या क्रिस्टल प्लाझा इमारतीत अनेकांचे प्राण वाचवणारी झेन सदावर्ते ही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचीच मुलगी आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी दिव्यंगत्वावर मात करुन विधी शाखेची पदवी मिळवली. इतकचं नाही तर पीएचडीसुद्धा पूर्ण केली आहे. वकिली आणि पीएचडी पूर्ण करण्याआधी त्यांनी दंतचिकित्साही पूर्ण केली आहे.

‘एक मराठा लाख मराठाच्या घोषणा’ पुणे महापालिका सभागृहात