संप नसतांना झालेल्या बालकाच्या मृत्यूला जबादार कोण? धनंजय मुंडेंचा सवाल

dhananjay munde

मुंबई: मेस्मा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाले. संप नसतांना झालेल्या बालकाच्या मृत्यूला जबादार कोण? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला.

भाजपने अंगणवाडी सेविकांच्या संपकाळात १२५ बालकांचा मृत्यू झाला म्हणून अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावत लावत आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत संप नसताना जुलै १७ मध्ये मृत्यू झालेल्या १४४८ आणि ऑगस्ट १७ मध्ये मृत्यू झालेल्या १२०० बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला.

मेस्मा ही सरकारची जबरदस्ती आहे. ज्यांच्यामुळे या राज्यात कुपोषण कमी झाले त्या अंगणवाडी सेविकांना आंदोलन करावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. २६ दिवस आंदोलन सुरू असल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य करून का घेतल्या नाहीत? असेही मुंडे म्हणाले