…अखेर गुजरातमध्ये भाजपचे शतक पूर्ण

कॉंग्रस मधील बड्या नेत्याच्या जावयासाठी या नेत्याला नाकारले होते तिकीट ; आता अपक्ष निवडणून येऊन दिलाय भाजपला पाठींबा.

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळाला. १५१ जागांच स्वप्न घेऊन निघालेले अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोडी कशी बशी ९९ जागांपर्यंत पोहचली आणि १५१ चे स्वप्न ५१ च्या शुभ आकड्याने हुकले. पण ९९ वर आलात आणि शतक हुकल ही बाब चैनेने बसू देत नाही. आणि हीच ओढ अखेर भाजपला शतकपर्यंत घेऊन गेली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ९९ जागांवर विजय मिळवलेल्या भाजपला शतक कस बुवा पूर्ण करता आलं ?

त्याच झाल अस की, गुजरातमध्ये २ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत होते त्यातील एक जिग्नेश मेवानी आणि दुसरे होते रतनसिंह राठौड त्यातील जिग्नेश मेवानी यांचा तर कॉंग्रेसला जाहीर पाठींबा होता. आता उरले होते ते महिसागर जिल्ह्यामधून लूनावाडा मतदार संघातून निवडणूक लढवलेल रतनसिंह राठौड. त्यांनी २१ डिसेंबरला आपण भाजप सरकारला ‘बिनशर्त’ पाठींबा देत असलेल एक पत्र दिल आहे. त्याची एक कॉपी गुजरात राजभवन मध्ये सुद्धा पोहोच झाली आहे.

कोण आहेत रतनसिंह राठौड ?

रतनसिंह हे मुळचे काँग्रेसी ते याआधी २००१५ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक जिंकले होते. एका शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या शिक्षण समितीचे सदस्य सुद्धा होते. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी कॉंग्रेसकडे आमदारकीच्या तिकीटाची मागणी केली परंतु त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यांनतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवायची ठरवली आणि मग पक्षातून त्यांना निलंबित केल गेल. आणि त्यांच्या जागेवर कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचे जावाई आणि संतरामपुर राजघराण्याचे राजकुमार परंजयादित्य परमार यांना तिकीट दिले गेले.

पण जेव्हा निकाल आले तेव्हा रतनसिंह राठौड यांनी भाजपच्या मनोज पटेल यांचा ३,२०० मतांनी पराभव केला. रतनसिंह राठौड यांना ५५,०९८ मते पडले. आणि कॉंग्रेसचे परंजयादित्य परमार हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

You might also like
Comments
Loading...