आठवलेंवर हल्ला करणारा प्रवीण गोसावी नेमका आहे तरी कोण ?

टीम महाराष्ट्र देशा –  अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने संविधान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. रात्री १० वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरून खाली येत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण गोसावी या तरुणाने आठवलेंना धक्काबुक्की केली. त्यानंतर आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविणला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहे.

रामदास आठवले वैयक्तिक स्वार्थासाठी आंबेडकरी जनतेचा वापर करुन घेत आहेत. याच रागातून प्रविण गोसावीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. प्रविण आठवलेंविरोधात सोशल मीडियावरहरी लिहीत होता, त्यामुळे हा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे प्रविण आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असून तो काही काळ आरपीआयचा सक्रीय कार्यकर्ता होता, अशीही माहिती समोर येत आहे. गोसावी हा व्यावसायिक असून कन्सस्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय असल्याची देखील माहिती समोर येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच सामाजिक कार्यकर्ता असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

बस ६०० फुट खोल दरीत कोसळूनही असे बचावले प्रकाश सावंत-देसाई

Loading...