आमच्या पार्टीचे धोरण ठरविणाऱ्या नवनीत कौर राणा कोण ? : शरद पवारांचा पलटवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.” असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील सरकारवरील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमधील बैठक सुमारे पन्नास मिनिटे चालली.

या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, सत्तास्थापनेबाबत आम्ही चर्चाच केलेली नसल्याचे सांगितले. तसेच, अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे म्हटले आहे. याविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता, कोण आहेत नवनीत कौर राणा? त्या आमच्या पार्टीचे धोरण ठरवणार का? असे सांगत शरद पवार यांनी नवनीत कौर राणा यांची शाळा घेतली.

दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार असल्याचे सांगत राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, असे विधान केले आहे. काल भाजपने शिवसेना एनडीएतून अधिकृतरीत्या बाहेर पडल्याचे जाहीर केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या खासदारांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधत आंदोलन केले.

केंद्राने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र शिवसेनेच्या मागणीवर राणा यांनी टीका केली. शरद पवारांनी देशाचे नेतृत्व केले आहे. अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावे, असे नवनीत कौर राणा यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :