सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण ?

श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट आणि महापौर मुक्ता टिळक यांचे दावे प्रतिदावे

 

पुणे : एका बाजूला सार्वजनिक गणेशोत्सवाचा १२५ वर्षीपूर्तीचा सोहळा पुणे महापालिकेच्या वतीने मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आता सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण आणि हा उत्सव नेमका कोणत्या वर्षी सुरु झाला यावरून चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे ते भाऊ रंगारी गणपती ट्रस्टकडून करण्यात आलेल्या दाव्याची.

खरतर आजवर १२५ वर्ष्यापुर्वी लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्याच आपण एकत आलो आहोत. मात्र भाऊ रंगारीं यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचा दावा ‘श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट’कडून केला जात आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव राजेंद्र गुप्ता आणि खजिनदार अनंत कुसुरकर यांनी पत्रकार परिषद घेत. भाऊ रंगारीं यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचे अनेक दाखले असल्याच सांगितल आहे. याशिवाय राज्य सरकारनेही ते मान्य करून त्या विषयीचा अहवाल दिल्याच ट्रस्टकडून सांगण्यात येत आहे . असे असताना सार्वजनिक गणेशोत्सवाला मागील वर्षीच 125 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा 125 वे वर्ष साजरे करण्याचे काहीच कारण नाही, असा युक्तीवाद करत महापौरांनीच हा वाद उकरून काढल्याचा आरोप ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे.

या संदर्भात सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना आणि महापौरांनाही पत्र दिले आहे. तावडे यांना ट्विटरवरून, इमेलद्वारे कळवले आहे. तसेच मागील वर्षी आणि यावर्षी देखील या संबंधीचे सर्व पुरावे दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारनेच या संबंधीचे पत्र दिले आहे आणि सरकारच आता 125 वे वर्ष साजरे करत आहे आणि त्यासाठी तरतूद केली आहे. जर सरकारने स्वत: दिलेले पत्र खोटे असेल तर सरकारनेच स्वत:चुकल्याचे सांगावे, अशी या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

मात्र, महापौर मुक्ता टिळक यांनी भाऊ रंगारी ट्रस्टचे दावे फेटाळत हा विषय मान्य केला नाही. ज. स. करंदीकर यांनी टिळकांवरील लिहिलेल्या पुस्तकातही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचा संदर्भ आहे. इंग्रजी शिक्षण आणि बोलण्यात शिथिलता येत असल्याचे लक्षात आल्याने ती घालवण्यासाठी धर्माचा आधार घेत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचे महापौर म्हणाल्या आहेत . तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकच आहेत  श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्टनेच याचे संदर्भ तपासावेत असा सल्ला हि महापौर मुक्ता  टिळक यांनी दिला आहे . त्यामुळे आता हे सर्व दावे प्रतिदावे पाहता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली हा वाद वाढण्याची श्यक्यता आहे.