राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले भागवत कराड नेमके आहेत तरी कोण?

Bhagwat Karad

औरंगाबाद : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. सात जागांसाठी सातच अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली. सातपैकी तीन जागांवर भाजपचे, दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे तर शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराची राज्यसभेवर निवड झाली आहे.

यामध्ये भाजपचे उमेदवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोसले आणि भागवत कराड, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि फौजिया खान, शिवसेनेच्या प्रियंका चर्तुवेदी आणि काँग्रेसचे राजीव सातव यांचा समावेश आहे.

Loading...

डॉ. भागवत किशनराव कराड रा. चिखली ता. अहमदपूर जि. लातूर या मूळ गावचे आहेत. त्यांचं सातवी पर्यंतचे शिक्षण चिखली या जि. प.च्या शाळेत झाले तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण अंधोरी जि. प. शाळेत झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी संस्थेच्या मोफत वसतीगृहात राहून अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून प्री मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले.

1972 साली त्यांनी औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून एमबीबीएस व एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी त्यांनी संपादन केली. एम.एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अति उच्च पदवी एम. सीएच (पेडियाट्रीक) ही पदवी त्यांनी मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे ते वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर ठरले. पत्नी डॉ. अंजली कराड या देखील नामवंत अश्या डॉक्टर आहेत.

तत्कालीन उपमुख्यमंत्री व भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांची भेट झाली. मुंडेंनी त्यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. 1995 साली ते संभाजीनगर महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले.पुढे उपमहापौर आणि नंतर औरंगाबाद शहराचे दोन वेळा महापौर होण्याचा मान मिळाला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका