fbpx

मध्यप्रदेश, राजस्थानचा मुख्यमंत्री ठरला, छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण ?

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीत तीन राज्ये जिंकलेल्या कॉंग्रेसला आपला मुख्यमंत्री ठरवण्यासाठी मात्र बराच काथ्याकूट करावा लागला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्याचा मुख्यमंत्री पदाचा तिडा सुटल्यानंतर आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला १५ वर्षानंतर सत्ता मिळाली आहे.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल, टी. एस. सिंह देव आणि ताम्रध्वज साहू यांच्या नावांची चर्चा आहे. कॉंग्रेस पक्षाकडून मात्र अजूनही नाव गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान या राज्याप्रमाणेच छत्तीसगडचा अंतिम निर्णय देखील राहुल गांधी हेच जाहीर करतील. राहुल गांधी यांचा निर्णय आज जाहीर होईल, अशी चर्चा आहे.