गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेले भूपेंद्र पटेल आहेत तरी कोण?

भूपेंद्र पटेल

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या पदावर घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार भुपेंद्र पटेल यांची वर्णी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर लागली आहे. आज ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नेहमीप्रमाणे भाजपने पुन्हा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली.

भूपेंद्र पटेल पाटीदार समाजातून येतात. विजय रुपाणी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. पटेल समाजातही त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते.

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभेचे आमदार आहेत. यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे (AUDA) अध्यक्ष होते. भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या :