मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. यांनतर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आव्हान संजय राऊत यांनी केले होते, संजय राऊतांच्या या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी ट्विट करत टीका केली आहे.
तुम्ही पुन्हा निवडून येऊन दाखवा असे संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज केलं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “ज्यांनी आयुष्यात कधी जनतेमधून निवडणूक लढवली नाही कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोचले ते ऐतखाऊ जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत”.
तुम्ही पुन्हा निवडून येऊनच दाखवा; संजय राऊतांचं शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज.
ज्यांनी आयुष्यात कधी जनतेमधून निवडणूक लढवली नाही कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोचले ते ऐतखाऊ जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत….@rautsanjay61 pic.twitter.com/zLLaBHrMHQ— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 23, 2022
नाना पटोले यांचा गंभीर आरोप –
उपमुख्यमंत्री अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे. मविआ सरकारला कोणताही धोका नाही. विरोधी पक्षात बसायची आमची तयारी आहे, असं देखील पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –