उदयनराजे भोसले की शरद पवार जाणून घ्या कोणाची आहे जास्त संपत्ती ?

मुंबई : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे हे सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते; परंतु त्यांनी या निवडणुकीनंतर या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर सातारा लोकसभा निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यामुळे उदयनराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे.

उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून १ कोटी ५६ लाख रुपयांच्या पाच गाड्या असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. तर मागील पाच वर्षांत ७७ लाख ३३ हजार ९८४ रूपयांनी उत्पन्न वाढले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याच्यांकडे ८ लाख २५ हजार ६९० रोख रक्कम तर पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे १ लाख ८५ हजार ६९० असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तर स्थावर मालमत्ते स्वरूपात उदयनराजे यांच्याकडे १ कोटी १० लाख २३ लाख ७५ हजार, पत्नी दमयंती राजे यांच्याकडे ७० लाख रूपयांची संपत्ती दाखविण्यात आली आहे. तर, स्वयंसंपादित आणि वारसाप्राप्त अशी एकुण २३ कोटी ३७ लाख ११ हजार ५३८ रूपयांची मालमत्ता आहे.

तसेच हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून २ कोटी २५ लाख ८६० इतकी रक्कम दाखविण्यात आली आहे. वाहन आणि व्यक्तीगत असे एकुण १ कोटी ८१ लाख ५५ हजार २२२ रूपयांचे कर्जही दाखविण्यात आले आहे. उदयनराजे यांच्याकडे १३ कोटी ५३ लाख ३३ हजार २१५ रूपयांची तर पत्नी दमयंती राजे यांच्याकडे १ कोटी ६१ लाख ६३ हजार १८७ आणि हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून १ कोटी ३ लाख १९ हजार २६८ रूपयांची जंगम मालमत्ता असल्याचे आपल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत शरद पवारांनी त्यांच्या संपत्तीविषयी विवरणपत्रात माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या संपत्तीत गेल्या ६ वर्षात ६० लाख रूपयांची वाढ झाली आहे. पवारांची संपत्ती ३२.७३ कोटी रूपये एवढी आहे. तसेच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पवार यांनी बुधवारी विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वत, पत्नी तसेच विभक्त हिंदु कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न व मालमत्तेची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अद्याप स्व: तचे वाहन नाही. राज्यसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्जसोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खा. शरद पवार ही माहिती दिली आहे. दरम्यान, पवार यांची बॅंक बचत खाते, अनामत रक्कम, शेअर्समधील गुंतवणूक दागिणे, जमीन, घर इत्यादी मिळून ३२ कोटी ७३ लाख ६७ हजार २७० रुपये एकूण मालमत्ता दाखविण्यात आली आहे. त्यात २५ कोटी २१ लाख ३३ हजार ३२९ जंगम व ७ कोटी ५२ लाख ३३ हजार ९४१ रुपये स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.