नरेंद्र मोदी नाहीतर मग काय डोनाल्ड ट्रम्प देतील का ‘बिहारला विशेष राज्याचा दर्जा’

पटना:गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असणाऱ्या नितीश कुमार आणि मोदींचा भाजप बिहारला विशेष राज्याचा देणार नसेल तर काय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देतील का बिहारला विशेष राज्याचा दर्जा अशा कडक शब्दात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना सुनावले आहे.

बिहारमध्ये एकूण २४३ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.परिणामी प्रचाराच्या तोफा शिगेला पोहोचल्या आहेत.अनेक राजकीय रथी – महारथी प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत.सगळ्यांनीच आपली – आपली राजकीय ताकत पणाला लावत स्वताला सिद्ध करायचा प्रयत्न सुरु केला आहे.

पण खरी लढत ही तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यातच होणार आहे.तर दुसरीकडे चिराग पासवान,पप्पू यादव आणि पुष्पम प्रिया चौधरी पूर्ण तयारीनिशी तंबू ठोकून उतरले आहेत.त्यामुळे बिहार विधानसभा नेमकी कुणाकडे जाते हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-