मुंबई: पवार साहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई करत आहेत. पवार साहेबांच्या घरावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले, त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली, न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील. असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी मनसेलाही टोला लगावला आहे. मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे, असा टोलाजयंत पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक; अमित ठाकरेंची पोस्ट व्हायरल
“सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका”,मुंबई गुन्हे शाखेची मागणी
“राज नाही तर उद्धवच बाळासाहेबांचे खरे वारसदार”; रामदास आठवलेंचं मत
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
INS VIKRANT घोटाळा: किरीट सोमय्या गुजरातमध्ये असल्याची माहिती!