मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकट आले आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांची अट मान्य न केल्यास शिंदे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईत संजय राऊत यांच्या घरासमोर बॅनरबाजी दिसून येत आहे. अशातच आता संजय राऊत यांनी पुन्हा खळबळजनक ट्विट केले आहे.
आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने”, असे खळबळजनक ट्विट केले होते. यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा दुसरे ट्विट केले आहे. “होय, संघर्ष करणार” असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
होय
संघर्ष करणार!! pic.twitter.com/zmsE0CQDL9— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
दरम्यान या राजकीय गदारोळावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. “शिवसेनेच्या आमदारांनी मला येऊन सांगावं की, तुम्ही मुख्यमंत्री नकोय आम्हाला. फक्त समोर येऊन सांगावं किंवा माध्यमांच्या सहाय्याने संवाद साधला तरी चालेल पण मी मुख्यमंत्री नकोय असे जेव्हा ते त्यांच्या तोंडून सांगतील त्या क्षणी मी राजीनामा देईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यांनतर संजय राऊत यांनी ट्विट करत इशारा दिला. संजय राऊत यांचा हा इशारा स्वपक्षाला? की भाजपला? हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –