नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं? : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला जातीवरून शिव्या दिल्या जातात अस विधान केल होतं. त्याला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे, नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं ? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

नरेंद्र मोदींनी अकलूज येथील सभेत ‘काँग्रेसने ज्याचं नाव मोदी आहे, त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली आहे. मी मागासवर्गीय असल्यामुळे मला अशी टीका सतत सहन करावी लागते. काँग्रेसने मला अनेकदा माझी जात सांगणाऱ्या शिव्या दिल्या आहेत,’ असं म्हणत काँग्रेसवर टीका केली. तसेच शरद पवार यांनी वाऱ्याची दिशा ओळखून निवडणुकीतून माघार घेतली आहे असा टोलाही शरद पवारांना लगावला आहे.

त्यालाचं उत्तर म्हणून अजित पवार यांनी ‘नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं? आता बोलायला मुद्देच नसल्यामुळे मोदी असं करत आहेत,’ अशा शब्दात आपले मत व्यक्त केलं आहे.