कोण उपटसुंभे येतात आणि एक दिवसात गोंधळ घालतात ; नानांचा राजकारण्यांवर निशाना

टीम महाराष्ट्र देशा : शेवटी जातधर्मापलिकडे असलेला माणूस महत्त्वाचा. मोर्चे करून काय साधणार जेव्हा आपण माणुसकी हरवत आहोत. कोण उपटसुंभे येतात आणि एक दिवसात गोंधळ घालतात. असं बोलत नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना टोला लगावला. अजय देवगण निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला मानूस’ या सिनेमात नाना पाटेकर सीआयडी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसतील. यानिम्मिताने ते न्यूज18 लोकमत या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘मला असं वाटतं मूठभर राजकीय मंडळी ज्यांना काही राजकीय स्थैर्य राहिलं नाही, ते गलिच्छ राजकारण करतात. सगळं आपण वाटून खात होतो. बाबासाहेब माझे नाहीत का, शिवाजी माझे नाहीत का, महामानवांना चबुतऱ्यावर उभं करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. बाबासाहेबांचे विचार आपण बाणवले पाहिजेत. नुसतं जय शिवाजी बोलून मराठा नाही होत.’

त्याचबरोबर नाना परखडपणे म्हणाले, ‘मला जातीचं ढिगळ लावू नका, माझ्याकडे माणू स म्हणून बघा.’