‘कटियार’ यांच्या बापाचा हा देश आहे का?- फारूख अब्दुल्ला

नवी दिल्ली: भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचा उल्लेख कोणी पाकिस्तानी असा करत असेल तर त्याविरोधात कायदा आणावा अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना विनय कटियार यांनी मुस्लिमांनी भारतात राहूच नये, पाकिस्तान किंवा बांग्लादेशात निघून जावे अशे विधान केले होते. दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी विनय कटियार यांचा चांगलाच समाचार घेतला.

फारूख अब्दुल्ला म्हणाले, मुसलमानांना देशाबाहेर जाण्यास सांगणाऱ्या कटियार यांच्या बापाचा हा देश आहे का, हा देश आपल्या सर्वांचा आहे. कटियार हे नेहमी द्वेष पसरवणारी वक्तव्ये करत असतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच कोणताच धर्म कटुतेबाबत सांगत नाही. प्रत्येक धर्मांत प्रेम, एकमेकांचा आदर करण्यास शिकवले जाते, असे त्यांनी म्हटले.