भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान कोण आहेत?

नवी दिल्ली – आज सकाळी पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. त्यांना भारतीय वायुसेनेने लगेच पिटाळून लावले. या पाकिस्तानी विमानामागे भारताचा एक वैमानिक गेला होता अशी माहिती मिळत आहे. त्यांचे नाव अभिनंदन वर्धमान असल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना अटक केल्याची माहिती व व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर ट्विटरवर काही वेळातच अभिनंदन हे टॉप टेनमध्ये आले.

अभिनंदन यांच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी नेटिझन्स सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. अभिनंदन यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाकिस्तानने पकडल्यानंतर तेथील नागरिक त्यांना मारून टाका म्हणून सांगत असल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे.

शिवाय, पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये डोळे व हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आहेत. ‘माझे नाव विंग कमांडर अभिनंदन. माझा सर्व्हिस क्रमांक 27981. मी हवाई दलाचा वैमानिक असून, माझा धर्म हिंदू आहे,’ असे या व्हिडिओमधून दाखवले जात आहे. शिवाय, त्यांच्याकडून माहिती वदवून घेतले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

अभिनंदन यांचा 16 मे 2011 मधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संबंधित व्हिडिओमध्ये वैमानिक एकत्र बसलेले असून, त्यांची ओळख सांगितली जात आहे. अभिनंदन यांचे वडील हे माजी एअर मार्शल आहेत.

दरम्यान, संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.Loading…
Loading...