केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय

– आवळा केवळ तुमच्या शरीरासाठीच उत्तम आहे, असे नाही. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठीही आवळ्याचा उपयोग होतो. आवळ्याला मेहंदीमध्ये मिसळून केसांना लावल्यास काळे केस पांढरे होण्यापासून रोखता येतं.

– काळ्या मिरचीच्या दाण्यांचं पाणी उकळावं. त्यानंतर ते उकळलेलं पाणी थंड करुन त्याने केस धुवावं. काळ्या मिरचीच्या दाण्याच्या पाण्याने केस सातत्याने धुवावं तरच त्याचा फायदा होईल.

– पांढऱ्या केसांना जर तुम्ही ब्लॅक टी किंवा कॉफीच्या अर्क वापरुन धुतल्यास पांढरे पडत चाललेले केस पुन्हा काळे होतात.
– हिना आणि दही यांना एकत्र करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट आठवड्यातून एकदा केसांना लावल्यास पांढरे केस काळे व्हायला सुरु होतात.

– कांदाही तुमचे पांढरे केस काळे करण्यास मदत करतो. अंघोळ करण्याच्या काही वेळ आधी कांद्याची पेस्ट केसांना लावावी. यामुळे पांढरे केस काळे होण्यास सुरुवात होते. विशेष म्हणजे कांद्याच्या पेस्टमुळे केस गळायचेही थांबतात

You might also like
Comments
Loading...