किन्नर ट्रस्टला भेट देत जॅकलिनने घेतले बाप्प्पाचे दर्शन

jacline farndanice

मुंबई: मागील वर्षापासून असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे काही निर्बंधाचे पालन करत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र तरी देखील अनेकांनी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच गणपती दिड आणि पाच दिवसाच्या गणपतीला मोठ्या थाटात निरोप देखील देण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने किन्नर ट्रस्टला भेट देत तेथील गणपती बाप्प्पाचे दर्शन घेतले आहे.

नुकतेच जॅकलिनने सोशल मिडीयावर याचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये जॅकलिन पॅरोट ग्रीन रंगाच्या सिल्क काठपदर साडीमध्ये दिसून येत आहे. जॅकलिन त्यांच्या आनंदात सहभागी झाली आहे.

त्यांच्यासोबत ती उत्साहात असल्याचे दिसत  आहे. तसेच यांच्या सोबत जॅकलिनने सुंदर नृत्यही केलं आहे. यावेळी जॅकलिन खूपच आनंदी दिसून येत होती. सध्या जॅकलिनच्या या फोटोची चांगलीच चर्चा होत असून अनेकजण यासाठी तिचे कौतुकही करत आहे.

महत्वाच्या बातम्या