कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकार फक्त राजकारण करते- राम शिंदे

ram shinde

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना आजाराने जनता त्रस्त झाली आहे पण सरकारला त्याचे काही देणे-घेणे नाही. राज्यातील सरकार फक्त राजकारणच करीत आहे.

अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. काल रक्तदान आणि प्लाझ्मा दान कार्यक्रम, तसेच समर्थ विद्यालय येथे वृक्षारोपण आणि उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप कार्यक्रम झाला, त्यावेळी प्रा.राम शिंदे बोलत होते.

प्रा.राम शिंदे पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडत आहे त्याठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच काम करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आले. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला.

अशा आर्थिक संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्यावतीने विविध योजनांद्वारे लोकांना आधार देण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. असे म्हणत प्रा.शिंदे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांच्या समवेत लक्ष्मण सावजी, नामदेव राऊत, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडिक, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकारीकर, तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष शांतीलाल कोपनर, सचिन पोटरे, अशोक खेडकर, काका धांडे, बापूसाहेब नेटके, बापूसाहेब शेळके, विनोद दळवी, अनिल गदादे, आशा वाघ, राखी शहा, सतीश समुद्र यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-