ट्रॅक्टर रॅलीवरून महाभारत सुरु असताना आता भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला वेगळे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल झाला.

कालच्या  घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.

कालच्या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कालच्या रॅलीमुळे वाद सुरु असताना आता भाजपाने तिरंगा रॅलीची घोषणा केली आहे. भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीमध्ये विशेष तिरंगा रॅली काढण्याची घोषणा केली आहे.

तिरंग्याचा अपमान आता सहन केला जाणार नाही. पोलिसांवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाही. आमचा तिरंगा आमचा सन्मान, आमचे पोलीस आमचा अभिमान. तिरंगा रॅली 30 जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. सेंट्रल पार्क कनॉट प्लेसपासून ही रॅली सुरू होईल. तुम्ही सुद्धा तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये नक्की सहभागी व्हाअसं कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.