नामांतराचा मुद्दा गाजत असताना जमाते इस्लामी हिंदचा स्तुत्य उपक्रम

While the issue of renaming is being raised, commendable initiative of Jamaat-e-Islami Hind

औरंगाबाद : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे नांमातराचा मुद्दा उचलून राजकीय मंडळी धार्मिक राजकारण करून शहरातील सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे जमाते इस्लामी हिंद या धार्मिक संस्थेने ‘अंधारातून प्रकाशाकडे’ हे राज्यस्तरीय अभियान आयोजित केले आहे. लोकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, एकोप्याची भावना रुजावी असा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

अंधारातून प्रकाशाकडे हे अभियान 22 ते 31 जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. समाजात एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन यादरम्यान करण्यात येणार आहे. सगळे कार्यक्रम हे कोरोनाचे शासकीय नियम पाळून केले जातील, असे आयोजकांनी कळवले आहे.

मुख्य कार्यक्रम 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे ही इस्लाम धर्माची शिकवण असून या कार्याक्रमात सर्व जाती-धर्मातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष इंजि. वाजिद कादरी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या