Share

IPL 2023 | धोनी vs जडेजा वाद सुरू असताना, जडेजाची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी मंगळवारी रिलीज आणि रिटेन खेळाडूंच्या याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही फ्रेंचाईजींनी आपल्या ठराविक खेळाडूंना संघात ठेवले आहे. तर, काही खेळाडूंना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनेक संघांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. तर, दुसरीकडे सर्व संघांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये काही खेळाडूंना करारमुक्त केल्याचा दिसत आहे. गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स सोबतच चेन्नई सुपर किंग या संघांनीही अनेक खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. तर महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ला आपल्या संघात कायम ठेवलं आहे.

दरम्यान, रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्ट माध्यमातून त्याने त्याच्यामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये कोणताही मेतभेद नसल्याचा संकेत दिला आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून रवींद्र जडेजा आणि CSK व्यवस्थापनामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर, रवींद्र जडेजा आणि CSK संदर्भातील सर्व पोस्ट त्याच्या सोशल मीडिया वरून हटवल्या होत्या. आयपीएलच्या मागच्या हंगामामध्ये रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली CSK ला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पर्वाच्या मध्येच संघाने धोनीकडे कर्णधारपद सोपवले होते. या निर्णयामुळे जडेजा नाराज असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात चांगली रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चानंतर ipl 2023 चा रिलीज आणि रिटेनमुळे या चर्चा कुठेतरी थांबल्या आहेत.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला संघातून करारमुक्त करू नये यासाठी थेट महेंद्रसिंग धोनीने मध्यस्थी केल्याच्या बातम्या सुरू होत्या. दरम्यान, धोनीने मध्यस्थी केली की नाही हा चर्चेचा विषय असला तरी त्याचा परिणाम मात्र रिटेन आणि रिलीज मध्ये दिसून आला आहे. कारण रवींद्र जडेजा आता संघामध्ये कायम आहे. CSK च्या या निर्णयानंतर रवींद्र जडेजाने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रवींद्र जडेजा आणि सोशल मीडियावर त्याचा महेंद्रसिंग धोनी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही CSK च्या जर्सी मध्ये असून जडेजा धोनीला वाकून अभिवादन करताना दिसत आहे. या पोस्टला जडेजा आणि कॅप्शन दिले आहे, ” Everything is fine, RESTART” म्हणजेच सर्व काही ठीक आहे पुन्हा नव्याने सुरुवात करूया. रवींद्र जडेजा आणि शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी मंगळवारी रिलीज आणि रिटेन खेळाडूंच्या याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now